Pune : रवींद्र धंगेकर आणि आबा बागुल यांना डावलून कोणताही निर्णय होणार नाही अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. आज शिवसेना भाजपला पुन्हा 25 जागांचा नवा प्रस्ताव देणार असून ज्या जागा भाजपला नको त्या जागा सेनेच्या माथी मारण्यात येत अशी अशी भावना पुण्यातील पदाधिकारींची आहे.
पुण्यात भाजपकडून १५ जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता मात्र त्याला सेनेचा विरोध आहे. ठाण्यात पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांची भेट घेतली.
थोडक्यात
एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, रवींद्र धंगेकर आणि आबा बागुल यांना डावलून कोणताही निर्णय होणार नाही
शिवसेना आज भाजपला पुन्हा २५ जागांचा नवीन प्रस्ताव देणार आहे
पुण्यातील पदाधिकारी अशी भावना व्यक्त करत आहेत की, ज्या जागा भाजपला नको त्या जागा सेनेच्या माथी मारल्या जात आहेत
पक्षातील निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता आणि सहभाग महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित
यामुळे भाजप-शिवसेना युतीतील जागा वाटपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत