कोकणातील रायगडमध्ये महायुतीतला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे. आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन निशाणा साधला आहे. भरत गोगावलेंना पालकमंत्री पद न देता सर्व काही स्वतःच्या पदरात पाडून घेण्याची सवय तटकरेंना असल्याचं महेंद्र दळवी म्हणाले आहेत. तर आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून सुनील तटकरे यांना निवडून दिल आहे.
त्यामुळे त्यांनी 2029 ची वाट न पहाता आता राजीनामा देऊन निवडणुकीच्या मैदानात उतरून दाखवावं. ते निवडून आले तर आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ आणि ते पराभूत झाले तर त्यांच्या कुटुंबाने राजकीय संन्यास घ्यावा असं थेट आव्हान अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिलं आहे. कुणीतरी पाळलेल्या प्रवक्त्याने बोलण्यापेक्षा तटकरे यांनी थेट समोर येऊन बोलावं असं महेंद्र दळवी म्हणाले.