रत्नागिरीत बोलत असताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महायुतीच्या नगरसेवकांना अल्टिमेंटम दिला आहे. एका वर्षात निवडून आलेल्या नगरसेवकांनी समाधानकारक काम केलं नाही तर त्या नगरसेवकाचा राजिनामा घेण्यात येईल असा इशारा उदय सामंत यांच्याकडून नगरसेवकांना देण्यात आला आहे.
तसेच शिवसेनेच्या उमेदवारांना 14 नोव्हेंबरला उमेदवारांना एबी फॉर्म मिळणार आहे. दरम्यान महायुतीच्या नगरसेवकाने काम दाखवलं नाही तर त्याला घरी पाठवलं जाईल. त्याचसोबत भले पोटनिवडणूक लागली तरी चालेल, पण अकार्यक्षम नगरसेवकांना यापुढे फार काळ टिकू देणार नाही. अशा नगरसेवकांनी राजिनामा द्यायचा. असं देखील उदय सामंत यांनी म्हटलं आहे.