पुण्यातील शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे मार्गावर शुक्रवारी रात्री हा भीषण अपघात झाला. या अपघातामुळे तीन मित्रांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रथमेश नंदकुमार शेलार (वय १८), हर्षल दिगंबर घुमे (वय १९) आणि आयुष अतुल जाधव (वय १६) यांचा समावेश आहे. हे तिघे एकाच दुचाकीवरून तळेगाव ढमढेरेकडे जात असताना, त्यांनी समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून आलेल्या पीएमपीएल बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
या घटनेची नोंद शिक्रापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. मृतांपैकी दोन तरुण तळेगाव ढमढेरे येथील तर एकजण मावळ तालुक्यातील असल्याची माहिती आहे. या दुर्दैवी घटनेने गावात आणि नातेवाईकांत हळहळ व्यक्त केली जात आहे.