मनसैनिकांना अनेक वेळा मराठी माणसाच्या हक्कासाठी गोंधळ घालताना पाहायला मिळालं आहे. मुंबईत मागील काही दिवसांमध्ये मराठी माणसावर आणि त्याच्या भाषेवर विरोध केल्याचे प्रकार घडले.
शाळेत हिंदी भाषा शिकवण्याच्या विरोधात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडताच, मनसैनिक मुंबईत आक्रमक झाले आहेत. भांडुप-कांजूरमार्ग परिसरात पुस्तक विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये जाऊन मनसैनिकांनी हिंदी भाषेची शालेय शिक्षणाची पुस्तक शोधून फाडून आणि जाळून टाकली. शालेय शिक्षणातील हिंदी भाषेची पुस्तके विक्रीसाठी ही ठेवू नये अशी ताकीद मनसैनिकांनी दुकानदाराना दिली.