ताज्या बातम्या

NCP : राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का; 'हे' नेते अजित पवार गटांच्या वाटेवर

शरद पवार गटाला मोठा धक्का; अजित पवार गटात सतीश पाटील, गुलाबराव देवकर यांचा प्रवेश.

Published by : Team Lokshahi

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर हे दोंन्ही नेते अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत. या घडामोडीमुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात चांगली रंगली आहे.

मुंबईतील के.सी. कॉलेजच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात या प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी माजी आमदार कैलास पाटील, दिलीपराव सोनवणे, महिला आघाडीच्या नेत्या तिलोत्तमा पाटील आणि धुळ्याचे माजी आमदार शरद पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी अजित पवार यांनी सर्वसमावेशक राजकारणावर भर देत, राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देण्यासाठी नव्या कार्यकर्त्यांची भर घालण्याचे आवाहन केले.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी गट महायुती सरकारचा भाग झाल्यानंतर, सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर यांनी शरद पवार यांची साथ दिली होती. एरंडोल-पारोळा मतदारसंघातून झालेल्या विधानसभा निवडणुकीत सतीश पाटील यांनी शिवसेनेच्या विद्यमान आमदार अमोल पाटील यांच्या विरोधात निवडणूकही लढवली होती. दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये शरद पवार यांच्या गटाला जळगाव जिल्ह्यात अपेक्षित यश मिळाले नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना, सत्तेच्या समीप राहण्यासाठी अनेक कार्यकर्ते सत्तारूढ गटात जाण्याच्या भूमिकेत आहेत, असे पाहायला मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा