वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आता एक ऑडिओ क्लिप देखील समोर आली आहे. मृत्यूच्या दोन-तीन दिवसांपूर्वी वैष्णवी हगवणे हिने स्वतःची आपबिती आपल्या मैत्रिणीला फोन करून सांगितली होती. स्वतःवर होत असलेले चारित्र्याचे आरोप, मारहाण आणि हुंड्यासाठी होणारा छळ हे सगळं वैष्णवी हगवणे हिने आपल्या मैत्रिणीकडे बोलून दाखवल आहे.
काय झाला वैष्णवीचा तिच्या मैत्रिणीसोबत संवाद?
"मैत्रिणींना मी सांगते की, तू किती घाणरेडी आहेत, शंशाकसोबत लॉयल नव्हती." असे वैष्णवीच्या मैत्रिणीने तिला सांगत होती.
वैष्णवीचे मैत्रिणीसोबत बोलताना म्हणाली की, "शंशाकच्या बहीणीच्या नवऱ्याने माझ्यावर हात उचलला. मी पप्पांना सांगितले आहे, घटस्फोट घेऊया, शशांक मला खूप मारतो, सासू- सासरे माझ्यासोबत नीट वागत नाही. माझा नवरा माझा कधीच नाही झाला, लग्न करुन मी या घरात आले, इथेच माझं चुकलं, माझ्या विचारशक्तीच्या पलीकडची इथे सर्व घडत आहे, शशांकने मला खूप शिव्याशाप दिले आहेत.