मध्यस्थी आणि आई वडील यांच्या पैशावरून वाद झाल्याने प्रकरण उघडकीस मुलीची विक्री तीन लाखाला झाली होती मात्र मध्यस्थीने दोन लाख रुपये दिल्याने मध्यस्थी आणि विक्री करणाऱ्या आई-वडिलांमध्ये वाद झाला आणि त्यामुळे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. मीनल ओंकार सपकाळ, ओंकार औदुंबर सपकाळ (दोघेही २९, रा. बिबवेवाडी), साहिल अफजल बागवान (वय २७, रा. सातारा), रेश्मा शंकर पानसरे (वय ३४, रा. येरवडा), सचिन रामा अवताडे (वय ४४, रा. येरवडा) आणि दीपाली विकास फटांगरे (वय ३२, रा. संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सुरुवातीला आमची मुलगी पळून नेली आहे अशी तक्रार द्यायला हे आई-वडील आले होते. त्यानंतर आई-वडिलांनीच विक्री केल्याचे समोर आला आहे.