ताज्या बातम्या

Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाचे आज उद्घाटन

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाचे आज उद्घाटन पार पडणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर प्रवास अवघ्या 10 मिनिटांत पार करता येणार आहे. कोस्टल रोडच्या उद्घाटन समारंभासाठी आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार अरविंद सावंत यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे.

या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच येत्या काही दिवसांत कोस्टल रोड हा वांद्रे वरळी सी लिंकला देखील जोडण्यात येणार आहे. प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी हा प्रकल्पातील पहिला टप्पा सुरू होणार आहे. उद्यापासून या कोस्टर रोडचा वापर करता येणार आहे.

2.7 किमीच्या बोगदा असलेल्या ठिकाणी ताशी 60 किमी वेगमर्यादा असणार आहे. सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आता या उद्घाटन सोहळ्याला आदित्य ठाकरे, अरविंद सावंत उपस्थित राहतात का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ