Mulund Sangam Video Game Parlor team lokshahi
ताज्या बातम्या

धक्कादायक ! पोलिसांच्या धाडीत ग्राहकाचा मृत्यु

मुलुंडच्या संगम व्हिडीओ पार्लरमधली घटना

Published by : Shweta Chavan-Zagade

राज्यात गेल्या काही दिवसांपासून धाडीचे सत्र सुरू आहे. राजकीय नेते आणि मंत्र्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाडी टाकल्या जात आहे. पण, अशाच एका धाडीच्या कारवाईमध्ये एका जणाचा जीव गमवावा लागला आहे.

मुंबईतील मुलुंड (Mulund) मध्ये असलेल्या संगम व्हिडिओ गेम पार्लर (Sangam Video Game Parlor) वर मुंबई पोलिसांच्या (mumbai police) समाजसेवा शाखेने टाकलेल्या धाडी मध्ये दिलीप तेजपाल या ग्राहकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या व्हिडिओ गेम पार्लर मध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने ला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर या शाखेच्या तिने पार्लर वर रात्रीच्या वेळेस धाड टाकली.

त्यावेळी दिलीप हा पार्लरमध्ये खेळत होता अचानक पार्लर वर पोलिसांची धाड पडल्यामुळे दिलीप याच्या छातीत कळ आली आणि तो जागीच बेशुद्ध पडला. त्याला पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केलं, परंतु त्या ठिकाणी डॉक्‍टरांनी दिलीपला मृत घोषित केले असून, अशी माहिती परिमंडळ सातशे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा