ताज्या बातम्या

कडक उन्हातही हवी आहे चमकदार त्वचा? मग आहारात 'या' फळांचा नक्की समावेश करा!

उन्हाळ्याच्या तडाख्यात आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं.

Published by : Team Lokshahi

उन्हाळ्याच्या तडाख्यात आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. सूर्यप्रकाशातील तीव्र किरणांमुळे त्वचेला नुकसान होऊ शकतं. अशा परिस्थितीत, त्वचेला नैसर्गिकरित्या उजळ आणि निरोगी ठेवण्यासाठी ऋतूमानानुसार मिळणाऱ्या फळांचा आहारात समावेश करणं फारच उपयुक्त ठरतं. या फळांमध्ये त्वचेसाठी आवश्यक असलेले पोषक घटक आणि कोलॅजन वाढवणारे गुणधर्म असतात.

उन्हाळ्यात शरीराला पुरेसं हायड्रेट ठेवणं आणि विविध रोगांपासून संरक्षण मिळवणं गरजेचं असतं. त्यासाठी ऋतुनुसार मिळणारी फळं खाल्ल्यास केवळ शरीराचं आरोग्य नाही, तर त्वचाही सुंदर, तजेलदार राहते. चला तर जाणून घेऊया अशी कोणती फळं आहेत जी आपल्या त्वचेसाठी अत्यंत गुणकारी आहेत.

पपई

पपई ही टॅनिंग आणि मुरुमांसारख्या समस्यांवर उपयोगी ठरतं. ही त्वचेला एकसंध, नितळ आणि तेजस्वी बनवतं.

टरबूज

टरबूजामध्ये व्हिटॅमिन C आणि लायकोपीन हे घटक असतात ज्यामुळे त्वचेचे सूर्यकिरणांपासून संरक्षण होते. हे फळं शरीर हायड्रेट ठेवतं आणि कोलॅजनची वाढ होऊन त्वचा तजेलदार होते.

आंबा

आंबा हे उन्हाळ्यातील प्रमुख फळ असून त्यात भरपूर व्हिटॅमिन A आणि C असतं. हे फळ त्वचेचं पोषण करतं आणि सुरुकुत्या कमी करण्यास मदत करते. मात्र आंबा योग्य प्रमाणात खावा.

अननस

अननसामध्ये व्हिटॅमिन C आणि मँगनीज मुबलक प्रमाणात असते. हे त्वचेचा रंग उजळण्यास, डाग कमी करण्यास आणि हायपरपिग्मेंटेशन दूर ठेवण्यास मदत करतं.

कीवी

कीवीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असते. भरपूर व्हिटॅमिन C असतं जे त्वचेतील कोलॅजन वाढवण्यास आणि त्वचेला ताजेतवाने ठेवण्यास मदत करते.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्येही भरपूर व्हिटॅमिन C असतं. हे त्वचेला सूर्याच्या तीव्र किरणांपासून वाचवतं आणि सुरुकुत्या कमी करतं.

संत्रे

संत्र्यामध्ये फ्लेव्होनॉईड्स आणि व्हिटॅमिन C हे घटक असतात. हे त्वचेचं नैसर्गिक तेज वाढवतं आणि पिग्मेंटेशन कमी करतं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nepal EX PM Wife Dies : नेपाळमध्ये हिंसाचार शिगेला! माजी पंतप्रधानांच्या पत्नीची जिवंत जाळून हत्या, या घटनेत झालानाथ खनाल...

Vice-Presidential Election : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर! सी.पी , राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती

Latest Marathi News Update live : एनडीएचे सी.पी. राधाकृष्णन 17वे उपराष्ट्रपती

Nepal Finance Minister Beaten By Protesters : नेपाळमध्ये आंदोलनाला हिंसक वळण! अर्थमंत्र्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, Video Viral