रामराजे निंबाळकर यांच्या संदर्भात एक महत्त्लाची बातमी समोर आली आहे. रामराजे निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर यांच्या फलटण आणि पुणे येथील निवासस्थानी आज इनकम टॅक्सच्या अधिकाऱ्यांचे छापे पडले आहेत. इन्कमटॅक्स विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहे.
आज सकाळी ६ वाजता इनकम टॅक्सच्या अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू आहे. बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नाही. त्यासह त्यांच्या विविध प्रकल्पवर ही आयकर विभागाचे पथक चौकशी करत आहे. विविध ठिकाणचे आर्थिक व्यवहार याबाबत चौकशी अधिकारी यांच्याकडून सुरू आहे.
आयकर विभागाच्या छाप्यांनंतर संजीवराजे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, या कारवाईवर फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आयकर विभागाच्या कारवाईचा चव्हाण यांनी निषेध केला असून राजकीय आकस बाळगून हि कारवाई होत असल्याचा आरोप माजी आमदार दीपक चव्हाण यांनी केला आहे.