दसरा-दिवाळीपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाची बुधवार, 18 ऑक्टोबर 2023 रोजी बैठक झाली. यामध्ये महागाई भत्त्यात वाढ मंजूर करण्यात आली.मोदी सरकारने दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना भेट दिली आहे.
महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करून तो 42 टक्क्यांवरून 46 टक्के करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या महागाईत हा निर्णय घेण्यात आल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.