ताज्या बातम्या

GBS Virus : राज्यभरात जीबीएसच्या रुग्णसंख्यांमध्ये वाढ, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

राज्यात जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ, 215 संशयितांपैकी 186 मध्ये जीबीएसची पुष्टी, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर.

Published by : Prachi Nate

जीबीएसची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याचं सध्या समोर येत आहे. या आजाराची लागण होऊन मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतचं चाललेली आहे. अशातच राज्यात जीबीएसचे शनिवारी दोन नवीन संशयित रूग्ण मिळाले असून राज्यात आतापर्यंत आढळलेल्या 215 संशयितांपैकी 186 मध्ये जीबीएसची पुष्टी झाली आहे. 29 संशयित रूग्ण आहेत.

राज्यातील एकूण 215 संशयितांपैकी 43 रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रात, 95 रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रात, 32 रुग्ण पिंपरी-चिंचवड क्षेत्रात, 33 रुग्ण पुणे ग्रामीणमध्ये आणि 12 रुग्ण इतर जिल्ह्यांमध्ये आढळले आहेत. यापैकी 153 जणांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. याशिवाय 32 जणांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे, तर 18 जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, बाधित भागात 7080 पाण्याचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते.

त्यापैकी 138 नमुने दूषित आढळले. दुसरीकडे, एकूण 88551 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, ज्यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रातील 46534 पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील 28361 आणि ग्रामीण भागातील 13956 घरांचा समावेश आहे. शिवाय, अँटी-गॅग्लिओसाइड अँटीबॉडीजच्या चाचणीसाठी 82 सीरम बंगळुरूमधील राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि न्यूरोसायन्सेस संस्थेत पाठवण्यात आले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया