संजय राठोड, यवतमाळ
प्रधानमंत्री आवास योजनेचा कालावधी पुन्हा दोन वर्षाने वाढविण्यात आला. ग्रामीण व शहरी भागात देण्यात येणाऱ्या तफावत आहे. आवास योजनेच्या निधीत वाढ करण्यात यावी अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी लोकसभेत केली.
प्रत्येकाला घर मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा कालावधी दोन वर्षांने वाढवण्यात आला आहे. परंतु, शहरी व ग्रामीण भागात देण्यात येणाऱ्या निधीत तफावत आहे. ती दूर करून समान निधी देण्यात यावा.
एससी, एसटी प्रवर्गाला मोठ्या प्रमाणात घरकुल देण्यात येत आहे. ओबीसींची संख्या50 टक्के आहे. त्या तुलनेत घरकुल कोटा कमी आहे. राज्य सरकार ला कोटा वाढवून देण्यासाठी खासदार भावना गवळी यांनी आवाज उठवला.