पाकिस्तानमध्ये दहशतवादाचा चेहरा म्हणून ओळखला जाणारा जैश-ए- मोहम्मदचा वरिष्ठ कमांडर मौलाना अब्दुळ अजीर इसार याचा मृत्यू झाला आहे. भारताबद्दलचे दहशतवाद्यांच्या मनात विष पेरण्याचे तो काम करत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल अजीज इसार हा पंजाब प्रातांतील भाक्कर जिल्ह्यातील कल्लूर कोट परिसरातील अशरफवाला येथील रहिवाशी होता. त्याचा मृतदेह पाकिस्तानमधील बहावलपूरमध्ये आढळला होता. परंतू त्याचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटाक्याने असल्याचे सांगण्यात आले आहे. अद्याप कारण समोर आले आहे. NIA च्या यादीत तो मॉस्ट वॉटेंड दहशतवादी होता.