Independence day 2025 : स्वातंत्र्यदिन साजरा करताना तिरंग्याचा सन्मान राखा; ध्वज फडकवताना 'हे' कायदेशीर नियम पाळा Independence day 2025 : स्वातंत्र्यदिन साजरा करताना तिरंग्याचा सन्मान राखा; ध्वज फडकवताना 'हे' कायदेशीर नियम पाळा
ताज्या बातम्या

Independence day 2025 : स्वातंत्र्यदिन साजरा करताना तिरंग्याचा सन्मान राखा; ध्वज फडकवताना 'हे' नियम पाळा

स्वातंत्र्यदिन 2025: तिरंग्याचा सन्मान राखा, ध्वज फडकवताना नियम पाळा.

Published by : Riddhi Vanne

Independence day 2025 : 15 ऑगस्ट हा देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमानाचा दिवस. या दिवशी तिरंगा फडकवताना तो केवळ एक कापडाचा तुकडा नसून, असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे प्रतीक आहे, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिन कायदेशीर आणि सांस्कृतिक दृष्ट्या सन्मानपूर्वक साजरा करण्यासाठी ‘ध्वज संहिता’चे नियम पाळणे बंधनकारक आहे.

राष्ट्रीय ध्वज हा खादीच्या कापडाचा असावा, जो हाताने सूत कताई करून आणि हाताने विणलेला असेल. तो कापूस, रेशीम किंवा लोकर या वस्त्रांपासून बनवता येतो. ध्वजाचा आकार नेहमी ३:२ या प्रमाणात असावा आणि त्यातील भगवा रंग वरती, पांढरा मध्ये आणि हिरवा खाली असणे अत्यावश्यक आहे. पांढऱ्या पट्ट्यातील अशोक चक्र स्पष्ट आणि योग्य स्थितीत असावे.

ध्वजाचा वापर कोणत्याही प्रकारे पडदा, कव्हर, पोशाख, उशी, रुमाल, टिश्यू किंवा कपड्यांवर छपाईसाठी करणे चुकीचे आणि बेकायदेशीर आहे. तिरंग्यावर कोणतेही अक्षर लिहिणे किंवा चित्र काढणे मनाई आहे. तसेच ध्वजाने व्यासपीठ, वक्त्याचे टेबल, इमारती किंवा वाहन झाकणे अनुचित आहे. तिरंगा जमिनीवर, पायाखाली किंवा पाण्यात स्पर्श होईल अशा स्थितीत ठेवू नये.

ध्वज फडकवताना तो स्वच्छ, व्यवस्थित आणि योग्य दिशेत असावा. भगवा रंग नेहमी वर राहिला पाहिजे आणि रंगांची जागा बदलणे टाळावे. अशोक चक्र किंवा पट्ट्यांची दिशा चुकल्यास तो तिरंग्याचा अपमान मानला जातो.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तिरंग्याचा योग्य सन्मान राखणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. हा दिवस केवळ उत्सवाचा नसून, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या वीरांना अभिवादन करण्याचा आहे. त्यामुळे १५ ऑगस्टला तिरंगा फडकवताना नियम पाळा, सन्मान राखा आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ करा.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा