Independent Candidates Increased Tension Mva Mahayuti All Political Parties In Zp And Panchayat Samiti Election 
ताज्या बातम्या

Maharashtra Politics : वाई, साताऱ्यात राजकीय रंगत वाढणार; अपक्षांनी घातली टेंशनची झळ!

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत बुधवारी संपली. सकाळपासूनच इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने अर्ज स्वीकार केंद्र गजबजून गेले होते.

Published by : Riddhi Vanne

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत बुधवारी संपली. सकाळपासूनच इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने अर्ज स्वीकार केंद्र गजबजून गेले होते. सातारा जिल्ह्यात भाजपने मोठ्या प्रमाणावर तयारी करत जिल्हा परिषदेसाठी 60 ठिकाणी, तर पंचायत समितीसाठी 118 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने 18 जिल्हा परिषद गट आणि 26 गणांमध्ये उमेदवार दिले आहेत. अजित पवार गट आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांकडूनही मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले असून, अंतिम आकडे अद्याप स्पष्ट झालेले नाहीत.

वाई तालुक्यात शेवटच्या दिवशी राजकीय वातावरण विशेष रंगलेले दिसले. जिल्हा परिषदेसाठी चार गटांमध्ये 36 अर्ज, तर पंचायत समितीच्या आठ गणांसाठी 45 उमेदवार मैदानात उतरले असून एकूण 81 अर्ज दाखल झाले आहेत. विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही जोरदार उपस्थिती नोंदवली आहे. ढोल-ताशे, फटाके आणि घोषणांनी तहसील कार्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येक पक्षाने शक्ती दाखवत अर्ज दाखल केले, त्यामुळे निवडणूक प्रचाराची नांदीच वाजली.

अपक्ष उमेदवारांची संख्या पाहता अनेक ठिकाणी ते निकालात महत्त्वाची भूमिका बजावतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अर्जांची छाननी, माघार आणि चिन्ह वाटपानंतर चित्र स्पष्ट होणार असून, वाई तालुक्यातील निवडणूक लढत अधिकच चुरशीची होणार आहे.

थोडक्यात

  • जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत बुधवारी संपली

  • सकाळपासून इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, अर्ज स्वीकार केंद्र

  • गजबजलेभाजप: जिल्हा परिषदेसाठी 60 ठिकाणी, पंचायत समितीसाठी 118

  • जागाराष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): 18 जिल्हा परिषद गट, 26 पंचायत समिती गण

  • अजित पवार गट आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांकडूनही मोठ्या संख्येने अर्ज
    अंतिम आकडे अद्याप स्पष्ट नाहीत

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा