ताज्या बातम्या

Digital Strike On Pakistan : भारताने केले पाकिस्तान सरकारचे 'एक्स हँडल' ब्लॉक

भारताने पाकिस्तान सरकारच्या कोणत्याही महत्त्वाच्या अधिकृत हँडलला ब्लॉक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Published by : Rashmi Mane

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. पाकिस्तान सरकारचे 'एक्स हँडल' ब्लॉक केले आहे. भारताने पहिल्यांदाच पाकिस्तानी सरकारी हँडल ब्लॉक केले आहे. https://x.com/GovtofPakistan हे अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आले आहे. भारताने पाकिस्तान सरकारच्या कोणत्याही महत्त्वाच्या अधिकृत हँडलला ब्लॉक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, https://x.com/GovtofPakistan हे अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आले असून कायदेशीर मागणीच्या आधारे खाते ब्लॉक करण्यात आले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाले आहे. बुधवारी रात्री उशिरा भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक पावले उचलली. भारताने सिंधू पाणी करार अनिश्चित काळासाठी स्थगित केला. भारतात उपस्थित असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगण्यात आले.

पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. तसेच भारतातील पाकिस्तानी दूतावासात उपस्थित असलेल्या लोकांची संख्या कमी करण्यात आली असून त्यांना भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय, भारताने इस्लामाबादमधील आपल्या उच्चायुक्तालयातून लष्करी सल्लागारांना मागे घेण्याचा निर्णय घेतला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

या हल्ल्याला पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचे पुरावे सरकारी संस्थांना सापडले आहेत. हल्ला केल्यानंतर गायब झालेले दहशतवादी पाकिस्तानात बसलेल्या त्यांच्या मालकांकडून सूचना घेत होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा