रशियन तेलावरचा अवलंब कमी करण्याच्या दिशेने भारताने मोठं पाऊल टाकलं आहे. जागतिक राजकीय तणाव आणि वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर भारत आता विविध देशांकडून तेल घेण्यावर भर देत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून महाराष्ट्रापेक्षाही लहान असलेल्या एका देशाने भारताला महत्त्वाची साथ दिली आहे.
दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर या देशाकडून भारताने कच्च्या तेलाची खरेदी केली आहे. एका सरकारी तेल कंपनीने तब्बल २० लाख बॅरल तेलाचा व्यवहार केला असून, भविष्यात आणखी खरेदी होण्याची शक्यता आहे. रशियन तेलाचा पुरवठा घटल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
अमेरिका आणि युरोपकडून रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांचा परिणाम भारताच्या तेल आयातीवर झाला आहे. त्यामुळे भारत आता आखाती देशांपुरता मर्यादित न राहता दक्षिण अमेरिकेतील देशांकडेही वळताना दिसत आहे. मेक्सिको, ब्राझील, कोलंबियासोबतच आता इक्वेडोरही भारताच्या यादीत सामील झाला आहे. क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि अर्थव्यवस्था यामध्ये महाराष्ट्रापेक्षा लहान असलेला इक्वेडोर आज भारतासाठी ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरत आहे. विविध देशांशी करार करून भारत आपली तेलपुरवठ्याची जोखीम कमी करत असल्याचं या व्यवहारातून स्पष्ट होत आहे.
थोडक्यात
भारताने रशियन तेलावरचा अवलंब कमी करण्यासाठी मोठे पाऊल उचलले.
जागतिक राजकीय तणाव आणि वाढत्या तेल दरांच्या पार्श्वभूमीवर भारत आता विविध देशांकडून तेल खरेदी करण्यावर भर देत आहे.
या प्रयत्नांचा भाग म्हणून महाराष्ट्रापेक्षा लहान देशाने भारताला महत्त्वाची साथ दिली.
भारताच्या ऊर्जासुरक्षा धोरणात महत्त्वाचा टप्पा.
जागतिक बाजारपेठेत भारतातील तेल खरेदीचे नवीन धोरण चर्चेत आहे.