भारतीय संघ आपल्या संवेदनशील आणि जबाबदार वृत्तीमुळे ओळखला जातो. देशात एखादी गंभीर किंवा दुर्दैवी घटना घडली की, अनेक क्रिकेटपटू सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त करत असतात. सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरू असून, लीड्समध्ये आजपासून तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे.
या सामन्याच्या प्रारंभी दोन्ही संघांनी अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या विमान अपघातातील बळींच्या स्मृतीला आदरांजली वाहिली. या अपघातात 250 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय आणि इंग्लंड संघातील सर्व खेळाडूंनी काळ्या हातपट्ट्या बांधून मैदानात उतरले. नाणेफेकीनंतर राष्ट्रगीतापूर्वी एक मिनिट मौन पाळण्यात आले.
बीसीसीआयने आपल्या अधिकृत 'एक्स' हँडलवर या घटनेची माहिती दिली. या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले की, दोन्ही संघांनी हेडिंग्ले मैदानावर मौन पाळून आणि काळ्या पट्ट्या बांधून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच, या दुर्घटनेत जिवीतहानी झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आल्या. या कृतीतून संघांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले असून संपूर्ण देशभरातून याचे कौतुक होत आहे.
हेही वाचा