ताज्या बातम्या

India-France : भारतीय नौदलाची ताकद वाढणार, भारत-फ्रान्समध्ये होणार Rafale-M jetsचा करार

राफेल-एम करार: भारत-फ्रान्समध्ये नौदलासाठी 63 हजार कोटींचा करार, 22 सिंगल-सीटर आणि 4 ट्विन-सीटर विमाने समाविष्ट.

Published by : Prachi Nate

जम्मू-काश्मीरमधील पहलगामध्ये झालेल्या दहशदवादी हल्ल्यानंतर भारतीय सरकार पाकिस्तान विरोधात रोज काही ना काही कठोर पाऊले उचलताना दिसत आहे. पहलगामधील दहशदवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू कराराला स्थगिती देत पाकिस्तानचे पाणी बंद केलं आहे. त्यानंतर पाकिस्तानने या कारवाईकडे युद्ध म्हणून बघितले जाईल असा इशारा दिल्यानंतर भारताने उरी धरणातून जास्तीचे पाणी सोडले. ज्यामुळे झेलम नदीला पूर आला आणि मुझफ्फराबादमधील अनेक गावे पाण्याखाली गेली. असं असताना आता भारत आणि फ्रान्समध्ये नौदलासाठी राफेल मरीन लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी करार होणार आहे.

हा करार भारतीय नौदलाची आणि भारतीय सैन्याची ताकद वाढेल. या करारासाठी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा होतील आणि त्याचसोबत स्वाक्षरी केल्या जातील. यादरम्यान या चर्चेत भारतीय संरक्षण सचिव राजेश कुमार आणि फ्रेंच राजदूत थिएरी माथू हे देखील आपली उपस्थिती दाखवणार असल्याची माहिती समोर येत आहे.

या करारादरम्यान यामध्ये भारतीय नौदलाला 26 राफेल-एम लढाऊ विमाने पुरवली जाणार असून 22 सिंगल-सीटर आणि 4 ट्विन-सीटर ट्रेनिंग व्हर्जन हे देखील समाविष्ट असणार आहेत. या विमानांची किंमत 63 हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. राफेल-एम विमानांचे वितरण 2028-29 साली सुरु होईल आणि हे सर्व विमाने 2031-32 पर्यंत डिलिव्हर होतील अशी माहिती आहे. नौदलाला पुरवण्यात येणारी ही लढाऊ विमाने भारतीय विमानवाहू जहाजे, आयएनएस विक्रमादित्य आणि स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांतमधून चालवली जातील. ज्यामुळे भारत आपली लष्करी क्षमता सतत वाढवू शकेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा