जपान मुंबईला दोन शिंकानसेन ट्रेन (बुलेट ट्रेन) भेट स्वरुपात देणार आहे. त्यांचा वापर मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या निरीक्षणासाठी केला जाणार आहे. इ5, इ6 या मॉडेलच्या या दोन ट्रेन भारतात 2026 पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. तसेच भारतातील बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू आहे.
320 किमी प्रति तास वेग असलेल्या या दोन ट्रेनमुळे भारतीय अभियंत्यांना शिंकानसेन बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान समजून घेण्यास मदत होणार आहे. 2030 च्या सुरुवातीला मुंबई-अहमदाबाददरम्यान इ10 शिंकानसेन ट्रेन चालविण्याचा भारत व जपानचा विचार आहे