मंदीच्या वाढत्या चिंता आणि अमेरिकेने लादलेले उच्च शुल्क आणि अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार तणावामुळे सोन्याच्या किमती वाढू शकतात, अशी शक्यतादेखील वर्तवली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशभरातील सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी स्वस्त झालेल्या सोन्याच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सोन्याचे भाव एक लाख रुपयांच्या पार जाणार का? या बद्दल सर्वसामान्यांमध्ये साशंकता व्यक्त होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, भारतात आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 550 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे आता एक तोळ्याची किंमत 98,080 रुपये झाली आहे. तसेच सोन्याची 10 ग्रॅम किंमत कालच्या 975300 रुपयांवरून आता 980800 रुपये झाली आहे.
कोणत्या शहरात किती दर ?
- मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9,808 रुपये आहे, 22 कॅरेट सोन्याचा दर 8,990 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 7,356 रुपये आहे.
- दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत थोडी जास्त आहे, 9,823रुपये, 22 कॅरेट सोन्याची किंमत 9,005 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 7,368 रुपये आहे.
- केरळमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 9,808 रुपये, 22 कॅरेट सोन्याची किंमत 8,990 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 7,356 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मंदीच्या वाढत्या चिंता आणि अमेरिकेने लादलेले उच्च शुल्क आणि अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार तणावामुळे सोन्याच्या किमती वाढू शकतात, अशी शक्यतादेखील वर्तवली जात आहे.