सोन्याच्या किंमतीमध्ये आता मोठी घसरण झालेली दिसून आली आहे. सोन्याचा दर आज बुधवार प्रती 10 ग्रामसाठी 96 हजार 593 रुपयांवर आला आहे. 22 एप्रिल रोजी एक लाख रुपयांच्या पार पोहोचला होता. आता सोन्याच्या दरात तोळ्यात 20 दिवसांत साडेपाच हजार रुपयांची घसरण झाली आहे.सोन्याच्या दरातील ही मोठी घसरण मानली जात आहे.
आगामी काळातही सोन्याच्या दरांमध्ये घसरण बघायला मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या लग्नसराईचा काळ असल्याने सोन्याच्या दरात असलेली घसरण ही सामान्य लोकांसाठी चांगली असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे अजून सोन्याचा दर काय असणार ? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 96 हजार 593 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, 22 एप्रिल रोजी हा दर 1 लाख 2 हजार 73 रुपयांपर्यंत होता. त्यामुळे अवघ्या तीन आठवड्यांत सोन्याच्या दरात जवळपास 5 हजार 480 रुपयांची घट झाली आहे.
भारतामध्ये साध्या लग्नसराईचा काळ असल्याचे सुगीचे दिवस असल्याचे मानले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, सोनं दीर्घकालीन गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असल्यामुळे, सध्याचा दर ही खरेदीसाठी चांगली संधी ठरू शकते. मात्र, जागतिक बाजारातील चढ-उतार लक्षात घेता, गुंतवणुकीचा निर्णय घेताना योग्य सल्ला घेणे गरजेचे आहे.