पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव आणि युद्धजन्य परिस्थिती असलेली पाहायला मिळाली. पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 'ओपरेशन सिंदूर राबवले. यामध्ये भारताने पाकिस्तानवर कारवाई करत तेथे आश्रयाला असलेल्या शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.नंतर पाकिस्तानने पुन्हा भारतावर हल्ले केले.भारताच्या सैन्यदलाने सर्व हल्ले परतवून लावले. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे.
भारताच्या 'परेशन सिंदूर'च्या वेळी संपूर्ण जगाने भारताची वायुदलाची ताकद आजमावली. अशातच आता भारताने 'भार्गवास्त्र'ही एक नवीन स्वदेशी काउंटर ड्रोन प्रणाली मिळाली आहे. भारताने आज ओडिसा येथील गोपाळपूर येथे स्वदेशी अॅंटीड्रोन सिस्टिम 'भार्गवास्त्र'ची यशस्वी चाचणी केली आहे. ही प्रणाली एकाच वेळी अनेक ड्रोनवर मारा करू शकते.
समोर आलेल्या माहितीनुसार, ओडिसा येथील गोपाळपूरमध्ये आर्मी एअर डिफेन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये रॉकेटच्या तीन चाचण्या घेण्यात आल्या. त्याप्रमाणे समोर आलेल्या अहवालानुसार, पहिल्या दोन चाचण्यांमध्ये प्रत्येकी एक रॉकेट डागण्यात आलं, तर तिसऱ्या चाचणीमध्ये सॅल्व्हो मोडमध्ये दोन सेकंदांच्या अंतराने दोन रॉकेट डागण्यात आले. चारही रॉकेटनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली.
'भार्गवास्त्र' ची वैशिष्ट्ये :
- ड्रोन हल्ले टाळण्यासाठी या यंत्रणेचा भारताला मोठा फायदा
- 6 ते 10 किलोमीटर अंतरावरून लहन आणि प्रचंड वेग असलेल्या ड्रोनचा शोध घेऊन त्यांना नष्ट करू शकते
- कोणत्याही ड्रोन हल्ल्यासारखी परिस्थिती उद्भवली तर भारताला आता भार्गवास्त्र या अँटी-ड्रोन सिस्टीमची मोठी मदत होणार