ताज्या बातम्या

Operation Sindoor : '...तर कदापी खपवून घेणार नाही'; उज्ज्वल निकम यांची Air Strike वर प्रतिक्रिया

भारतीय सैन्य दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ला केल्यानंतर भारतात जल्लोषाचं वातावरण आहे.

Published by : Rashmi Mane

भारतीय सैन्य दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ला केल्यानंतर भारतात जल्लोषाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट आणि 26/11 मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील खटल्याचे सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारताने जगाला दाखवून दिले की, असे हल्ले भारत खपवून घेणार नाही, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

काय म्हणाले अॅड. उज्ज्वल निकम

सरकारी वकिल उज्ज्वल निकम म्हणाले की, "भारताने हा पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला, अस म्हणणार नाही. आपण जशाच तस उत्तर दिलं. मी 1993 चा खटला चालवला, अजमल कसाबचा 26/11 चा खटला चालवला. या खटल्यामध्ये प्रामुख्याने या अतिरेक्यांच्या विरोधात खटला चालवण्यात. त्यात त्या अतिरेक्यांनी मुरीके आणि मुझफ्फराबाद (ही ठिकाणे लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दोन दहशतवादी गटांशी संबंधित) या दोन ठिकाणी त्यांना 'खासा ए दौरा', 'खासा ए दीवान' तिथे त्यांना ट्रेनिंग दिलं जायचं, असा त्यांनी स्पष्ट कबुली जबाब दिला होता. ज्या 9 ठिकाणी भारतीय सैन्यानं हवाई हल्ला केला, त्यात ही दोन ठिकाणं आहेत. याचाच अर्थ असा, की आपण मर्यादित हल्ला केलायं. यासाठी सर्व प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय सैन्य, हवाई दल यांच अभिनंदन करतो. आपण जगाला दाखवून दिलयं की, आमच्या भूमीवर जर कोणी दहशतवादी कृत्य केली, तर कदापी खपवून घेणार नाही. हा स्ट्राँग मेसेज आपण संपूर्ण जगाला दिला आहे, असे त्यांनी नमूद केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा