हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज विधानसभेमध्ये समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी आणि भाजप खासदार नितेश राणे यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. अबू आझमी यांनी विधानसभेत हिंदू-मुस्लिम मुद्दा उपस्थित केला. दरम्यान मंदिर-मस्जिदबाबत अबू आझमी चुकीची माहिती सांगत असल्याचा आमदार नितेश राणे यांनी आरोप केला.
काय म्हणाले अबू आझमी?
भारत देश हा धार्मिक देश आहे. आपल्या देशात महापुरूषांविरोधात जर कुणी वक्तव्य केल्यास आपला जीव गेल्यास ही लोकं मागे पुढे पाहत नाहीत. परभणीचं उदाहरण देत ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लोकं पुजतात. त्यांच्याविरोधातही कोणी वक्तव्य केलं तर लोकं रस्त्यावर उतरतात. काही लोकं आंदोलनं करतात, जेलमध्ये जातात, कोणाचा मृत्यूही होतो. जेम्स लेनच्या पुस्तकाचा दाखला त्यांनी दिला. त्रिपुरामध्ये मस्जिद जाळली गेली, मालेगावात ७० लोक जेलमध्ये होते, नांदेड प्रकरणामध्ये लोकं जेलमध्ये होते. नवरात्री आली की मस्जिदसमोर येऊन सांगितलं जात की इस देश मे रेहना है तो जय श्रीराम केहना हैं... मुस्लिमांवर सक्ती का केली जाते. मशिदीच्या घुमटावर भगवा झेंडा फडकावला का जातो. यामुळे वाद होतात, वाद विकोपाला जातात. यामुळे
विशालगडावर मशिदीवर चढून घुमटावर हाथोडी मारण्यात आली. विशालगडावर मशिदीत कुराण जाळलं गेलं. ३५-५० लोकांचं घर तोडण्यात आलं. हिंदू आणि मुसलमानांना लढवलं जात आहे. बांगलादेशामध्ये जे सुरु आहे त्याचा आपण निषेध करतो. मात्र, आपल्या देशात पोलिस मुसलमानाला गोळी मारतो त्याचा निषेध का केला जात नाही. शिक्षक एका मुसलमान मुलाला उभं करून इतर विद्यार्थ्यांना त्याला मारायला सांगते त्याचा निषेध का केला जात नाही.
बुलढाण्यात टीपू सुलतान जयंती परवानगी घेऊन साजरी केली. मात्र, गरीब मुसलमानांच्या कच्च्या घरात घुसून पोलिसांनी त्यांना मारलं. त्यांची घरं जाळण्यात आली. या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. जर तुम्हाला खरंच देशात कायदा आणि सुव्यवस्था राखायची आहे तर कोणीही महापुरुषांविरोधात वक्तव्य केलं, पैगंबराविरोधात वक्तव्य केलं, मंदिर-मशिदीवरून वाद केला तर अशा व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी असा कायदा करण्याची विनंती आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपल्यामध्ये हिंदू-मुसलमानांमध्ये भाईचारा असावा अशी आपण दुवा करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
नितेश राणे यांनी काय प्रत्युत्तर दिलं?
अबू आझमी चुकीची माहिती सांगत आहेत. गणपती मिरवणुकीवर कोण दगड मारतंय. आमची मंदिरं तोडली जात आहेत. आझमी यांना वस्तूस्थितीला धरून बोलावं. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे काय खरं काय खोटं असं वक्तव्य निलेश राणे यांनी केलं आहे.