ताज्या बातम्या

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पोहचले विद्रोही साहित्य संमेलनस्थळी

विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या सभमंडपाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष चपळगावकर तसेच ज्येष्ठ समाजसेवक अभय बंग यांची भेट.

Published by : Sagar Pradhan

भूपेश बारंगे|वर्धा :  वर्ध्यात ९६ व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तसचं १७ व विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बंग यांनी विद्रोही साहित्य संमेलनस्थळी भेट दिली. यावेळी ते काही वेळ विद्रोही मराठी साहित्य संमेलनातील सभामंडपात बसले. चपळगावकर आणि बंग यांनी दिलेली भेट अनेकांकरीता आश्चर्याची ठरली. यावेळी विद्रोहीच्या सभामंडपात देखील उपस्थितांना आश्चर्य वाटले.

वर्ध्यात १७ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच आज उद्घाटन झालं. शुक्रवारी ९६ व्या अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात झाली होती. ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बंग यांनी अचानक भेट दिली.

न्यायमूर्ती चपळगावकर यांनी विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देऊन एक मोठा संदेश दिलाय. साहित्यात विभाजन असू शकत नाही. समाज बदलला पाहिजे असं सर्वांना वाटतं. दोन संमेलन वेगळे झाले तरी हरकत नाही. पण दोघांमध्ये आपुलकी असली पाहिजे. संवाद पाहिजे, येणं जाणं पाहिजे स्वतः त्यांनी आज येथे येऊन आपल्या प्रत्यक्ष कृतीतून करून दाखवलं. हा मोठा पूल त्यांनी दोन्ही साहित्य समेलनात उभा केला. त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करायला पाहिजे.

महात्मा फुले यांनी 1885 यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, हे संमेलन वेगवेगळे का आहे. काय केल्याने समाजात एकी होईल याचे बीज शोधून काढत नाही. तुंम्ही उंटावरून शेळ्या हकणारे संमेलन वाले आहात. त्याच सम्मेलनाचे नेतृत्व चपळगावकर करीत आहेत. काय केल्याने एकी निर्माण होईल याचे बीज शोधून काढत नाही. तोवर अखिल भारतीय संमेलन अजूनही तेच करीत आहे. त्यांनी महात्मा फुले यांनी अपमानित केले. ते अजूनही पूर्वीच्याच वाटेने चालले आहे. ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला त्यांना देखील यांनी मंचावर बोलावले नाही. प्रस्थापिताविरुद्ध विद्रोह करणे ही काळाची गरज आहे. त्यांचे अध्यक्ष इकडे आले आहे, त्यांचे प्रेक्षक तर आधीच इकडे आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा