ताज्या बातम्या

Chenab River Water: भारताचा पाकिस्तानला पुन्हा मोठा धक्का; चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचं पाणी थांबवलं

पहलगाम हल्ल्यानंतर सध्या तणावाचे वातावरण आहे, या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर सध्या तणावाचे वातावरण आहे, या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारताना (India ) पुन्हा एकदा पाकिस्तानला (Pakistan) मोठा धक्का दिला आहे. सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यानंतर वुलर सरोवराचं पाणीही पाकिस्तानसाठी बंद केलं.

त्यानंतर आता भारत सरकारने चिनाब नदीवरील (Chenab River Water) बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवण्यात आला आहे. यानंतर झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचंही पाणी थांबवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

India - US Trade Deal : भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करारावर महत्त्वाची चर्चा; लवकर निर्णयाची शक्यता

Latest Marathi News Update live : आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

Mumbai Monorail : मुंबईची मोनोरेल काही काळ राहणार बंद; तांत्रिक बिघाडावर तोडगा काढण्यासाठी निर्णय

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आईसोबतच्या आठवणींना उजाळा दिला,म्हणाले...