India-Pakistan War 
ताज्या बातम्या

India-Pakistan War : पाकिस्तानला आता सगळीकडून घेरलं; आकाशातून मिसाईल, ड्रोनचा मारा, आता पुरात बुडणार पाकिस्तान?

पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Attack) बदला घेण्यासाठी भारताने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूर सुरु करण्यात आले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Attack) बदला घेण्यासाठी भारताने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूर सुरु करण्यात आले आहे. पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांना लक्ष्य करून भ्याड हल्ले केले आहेत. जो सुरक्षा दलांनी हाणून पाडला आहे.

पाकिस्तानने अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. दरम्यान, एका पाकिस्तानी पायलटलाही भारतीय सीमेत पकडण्यात आले. पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी अनेक भारतीय शहरांना लक्ष्य करून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. (India-Pakistan War) भारतीय सैन्याने योग्य प्रत्युत्तर दिले आणि सर्व हल्ले हाणून पाडले.

भारताने सिंधू जल करार स्थगित केला आणि त्यानंतर आता 9 मे रोजी सकाळी चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या सलाल धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने सलाल आणि बगलिहार धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाकिस्तानात पूरस्थिती निर्माण होऊ शकते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amol Mitkari : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते...; अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती, अमोल मिटकरींचा दमानियांना टोला

Pandharpur Rain Update : पंढरपूरला पूरसदृश परिस्थिती; चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली

ITR Filing Extension : करदात्यांना दिलासा; आयटीआर फाइल करण्यासाठी मुदतवाढ

Beed Rain Update : बीडमध्ये पावसाचा कहर; आज शाळांना सुट्टी जाहीर