ताज्या बातम्या

VIDEO : India-Pakistan War : पंजाबमध्ये शेतात पडलं पाकिस्तानचं मिसाईल तर जैसलमेरमध्ये जिवंत बॉम्ब, व्हिडिओ समोर

भारतीय सैन्याने योग्य प्रत्युत्तर देत सर्व हल्ले हाणून पाडले.

Published by : Siddhi Naringrekar

पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Attack) बदला घेण्यासाठी भारताने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूर सुरु करण्यात आले आहे. पाकिस्तानने भारतातील (India-Pakistan War ) अनेक शहरांना लक्ष्य करून भ्याड हल्ले केले आहेत. जो सुरक्षा दलांनी हाणून पाडला आहे.

पाकिस्तानने अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी अनेक भारतीय शहरांना लक्ष्य करून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. (India-Pakistan War) भारतीय सैन्याने योग्य प्रत्युत्तर दिले आणि सर्व हल्ले हाणून पाडले.

पाकिस्तानने जैसलमेर, बिकानेर आणि श्रीगंगानगरसह सीमेलगत असलेल्या अनेक ठिकाणी ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले. यातच आता राजस्थानच्या जैसलमेरमध्ये जिवंत बॉम्ब आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

यासोबतच पंजाबच्या होशियारपूरमध्ये पाकिस्तानचे मिसाईल आढळून आले आहे. हे मिसाईल शेतामध्ये पडले. घटनेची माहिती मिळताच लष्कराच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अधिक तपास सुरु असून याचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray On Meenatai Statue : "हे करणारे दोनचं व्यक्ती असू शकतात" मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रकार, उद्धव ठाकरेंचा निशाणा कोणाकडे?

Uddhav Thackeray On Narendra Modi : “मोदी हे आपले शत्रू नाहीत, पण ते..." पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत उद्धव ठाकरेंनी केलं मोठ वक्तव्य

iPhone17 मार्केटमध्ये लॉन्च ; जाणून घ्या 'ही' वैशिष्ट्य

Hollywood Star Robert Redford : मोठी बातमी! हॉलिवूडचा ‘गोल्डनबॉय’ रॉबर्ट रेडफोर्ड यांचे निधन