भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या शांतता असलेली दिसून येत आहे. मात्र सीमेवर अजूननही तणाव असल्याचे पाहयला मिळत आहे. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी भारतीय सीमा रेषा ओलांडून गेलेला BSF जवान 21 दिवसांनंतर भारतात परतला. 21 दिवस पाकिस्तानमध्ये राहिल्यानंतर तिथे जवानाला कशी वागणूक मिळाली याबद्दल त्याने सांगितले आहे. त्याचा झालेला छळ ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.
पंजाबमधील फिरोजपूरमध्ये BSF जवानाने चुकून सीमारेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला होता. BSF जवान पूर्णम शॉ यांना 21 दिवसांनी मायदेशी परत आणले गेले. पण पाकिस्तानमध्ये असताना त्यांना खूप त्रास दिला गेला असे त्यांनी संगीतले आहे. पाकड्यांनी छळ करण्याची एकही संधी सोडली नाही असे ते म्हणाले. अनेक दिवस त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून ठेवण्यात आली. तसेच त्यांना झोपूही दिलं नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. सैनिकाचा छळ करुन भारतीय गुप्तचर विभागाबद्दल माहिती काढून घेण्याचादेखील प्रयत्न करण्यात आला.
समोर आलेल्या माहितीनुसार, पूर्णम कुमार शॉ यांचा शारीरिक छळ करण्यात आला नाही तर मानसिक दबावाच्या अनेक पद्धती वापरण्यात आल्या होत्या. यामुळे त्याच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. 14 मे रोजी अटारी-वाघा सीमेवरून त्यांची सुटका करण्यात आली.
मानसिक खच्चीकरण :
त्याचप्रमाणे दात घासण्याची किंवा मूलभूत स्वच्छता राखण्याचीदेखील परवानगी नव्हती. अशा गोष्टींद्वारे मानसिक स्थिती बिघडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला. अटकेदरम्यान, शॉ यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थिती, विशेषतः पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता, त्या दरम्यान शॉ यांची सुटका झाली.