पुणे शहरातही सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. याच पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची सुरक्षा अधिक वाढवण्यात आली आहे. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस व आर्मीचे जवान तैनात असून, प्रत्येक व्यक्तीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.
दंगल नियंत्रण पथक देखील मंदिर परिसरात उपस्थित असून, मंदिरात जास्त वेळ थांबण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सुरक्षा कारणास्तव रात्रीपासूनच परिसरात पोलीस गस्त सुरू आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतत नजर ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.