जगभरात ऑफिस रोमॅन्सचा ट्रेंड वाढत असताना, भारतातील परिस्थितीही लक्षणीयरीत्या बदलत आहे. अॅशली मॅडिसन आणि YouGov यांनी केलेल्या नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक सर्वेक्षणानुसार भारत कार्यालयीन प्रेमसंबंधांमध्ये जगात दुसऱ्या स्थानावर आहे. मेक्सिको पहिल्या क्रमांकावर असून भारतीय कर्मचारी ऑफिस रोमॅन्सबाबत अधिक खुले विचार दाखवत असल्याचे या अहवालात नमूद आहे.
40 टक्के भारतीय कर्मचाऱ्यांनी मान्य केला ऑफिस रोमॅन्सचा अनुभव
या सर्वेक्षणानुसार सुमारे 40% भारतीय कर्मचारी सध्या आपल्या सहकाऱ्याला डेट करत आहेत किंवा पूर्वी ऑफिसमध्ये कोणाशी तरी रिलेशनशिपमध्ये होते. म्हणजेच हा विषय आता फक्त अफवा किंवा ‘कॉफी मशीन गॉसिप’ राहिला नाही, तर प्रत्यक्ष वास्तव बनला आहे. अहवालात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उघड झाला—पुरुष कर्मचारी कार्यालयीन नात्यांबाबत अधिक खुले आहेत, तर तरुण कर्मचारी करिअरवर त्याचा परिणाम होईल या भीतीने अधिक सावध राहतात. तज्ज्ञांच्या मते, कामाच्या ठिकाणी एकत्र घालवला जाणारा मोठ्या प्रमाणातील वेळ आणि सततचा संवाद या दोन्ही कारणांमुळे भावनिक जवळीक सहज निर्माण होते. तथापि, ऑफिस रोमॅन्स वाढत असला तरी त्याचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, नातं टिकवताना करिअरवर घाला पडण्याची शक्यता निर्माण होते.
१. स्पष्ट सीमारेषा आखा - कामाचे आणि वैयक्तिक आयुष्याचे काय वेगळे ठेवायचे आणि काय सामायिक ठेवायचे हे दोघांनी आधीच ठरवणे आवश्यक आहे. यामुळे ऑफिसमधील अनावश्यक गॉसिपपासून बचाव होतो आणि कामावर लक्ष केंद्रित राहते.
ऑफिसमध्ये कोणत्या गोष्टी बोलायच्या आणि कोणत्या वैयक्तिक ठेवायच्या याबाबत पार्टनरशी स्पष्ट चर्चा करा. पारदर्शक संवादामुळे गैरसमज टाळता येतात आणि नातं मजबूत होतं.
-प्रेम महत्त्वाचं आहे, पण काम प्रथम हे तत्त्व पाळणं आवश्यक आहे. डेडलाईन्स आणि जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास वैयक्तिक नात्याचा परिणाम करिअरवर होऊ शकतो
सहकाऱ्यांपुढे किंवा वरिष्ठांसमोर अतिउत्साह, ओव्हरअॅक्टिंग किंवा जवळीक दाखविणे टाळा. यामुळे प्रतिमा खराब होण्याची शक्यता असते. व्यावसायिक वर्तन राखणे हीच खरी सुरक्षितता.
ऑफिस रोमॅन्सविषयी सोशल मीडियावर जास्त माहिती उघड करणं धोकादायक ठरू शकतं. पोस्ट करण्यापूर्वी दोनदा विचार करा. वैयक्तिक बाबी जितक्या खास ठेवता येतील तितका तणाव कमी होतो. जग बदलत असताना आणि ऑफिसमध्ये नात्यांची स्वीकृती वाढत असताना, प्रेम आणि करिअर यांच्यात समतोल राखणेच स्मार्ट मार्ग असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
योग्य पद्धतीने हाताळले तर ऑफिस रोमॅन्स तणावाचे कारण न ठरता आनंददायी ठरू शकतो. त्यामुळे सहकाऱ्याला डेट करण्यापूर्वी हे ५ मुद्दे लक्षात ठेवा आणि दोन्ही आयुष्यांमध्ये संतुलन टिकवा!