ताज्या बातम्या

India-Russia Deal : भारत-रशिया कराराने विमान उद्योगाला नवी दिशा! सुखोई सुपरजेट SJ-100 आता भारतात तयार होणार

भारताच्या नागरी विमानउद्योगासाठी अत्यंत महत्त्वाची अशी मोठी प्रगती झाली आहे. भारत-रशियामध्ये सोमवारी मॉस्कोमध्ये ऐतिहासिक करार करण्यात आला.

Published by : Prachi Nate

भारताच्या नागरी विमानउद्योगासाठी अत्यंत महत्त्वाची अशी मोठी प्रगती झाली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि रशियाची प्रमुख विमान उत्पादक कंपनी युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (UAC – Public Joint Stock Company United Aircraft Corporation) यांनी सुखोई सुपरजेट SJ-100 या प्रवासी विमानाचे उत्पादन भारतात करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. सोमवारी मॉस्कोमध्ये हा ऐतिहासिक करार करण्यात आला.

या सहकार्यातून मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानाला मोठे बळ मिळणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. भारतात नागरी विमाने निर्माण करण्याचे प्रमाण वाढल्यास देशाच्या एरोस्पेस उत्पादन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्याची अपेक्षा आहे. सुखोई सुपरजेट SJ-100 हे आधुनिक तंत्रज्ञानयुक्त ट्विन-इंजिन, नॅरो-बॉडी प्रवासी विमान आहे. सुमारे १०० प्रवाशांची क्षमता आणि अंदाजे ३,००० किलोमीटर रेंज असल्याने हे विमान लहान ते मध्यम अंतराच्या प्रवासासाठी उपयुक्त मानले जाते. जगातील अनेक विमान कंपन्यांमध्ये SJ-100 यशस्वीपणे उड्डाण करत आहे.

या प्रकल्पातून देशातील प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटी मजबूत होईल, असेही मानले जाते. केंद्र सरकारच्या ‘उडान’ (Ude Desh Ka Aam Nagrik) योजनेअंतर्गत लहान शहरांना आणि दूरवरच्या भागांना हवाई मार्गाने जोडण्याचे उद्दिष्ट असून, SJ-100 सारखे विमान त्यासाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.

विमान निर्मितीबरोबरच घटक, मेंटेनन्स आणि पुरवठा साखळीशी संबंधित उद्योग क्षेत्रात रोजगार वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतातील उत्पादन क्षमता, तांत्रिक कौशल्य आणि एव्हिएशन सेक्टरमधील पायाभूत सुविधांना नवी गती मिळेल.

भारत-रशिया यांच्यात संरक्षण क्षेत्रातील सहकार्याला दशकांचा इतिहास आहे. नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील हा करार दोन्ही देशांतील धोरणात्मक भागीदारीला अधिक मजबूती देणारा ठरेल. तज्ञांच्या मते, या प्रकल्पामुळे भारताचा विमान उद्योग अधिक स्पर्धात्मक बनेल आणि जागतिक बाजारपेठेत देशाची उपस्थिती अधिक ठळक होईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा