Donald Trump : मोठी बातमी! ट्रम्प यांचा नवा आक्षेप; अमेरिकेचा टॅरिफ वाढवण्याचा निर्णय Donald Trump : मोठी बातमी! ट्रम्प यांचा नवा आक्षेप; अमेरिकेचा टॅरिफ वाढवण्याचा निर्णय
ताज्या बातम्या

Donald Trump : मोठी बातमी! ट्रम्प यांचा नवा आक्षेप; अमेरिकेचा टॅरिफ वाढवण्याचा निर्णय

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी भारतावर 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावत असल्याचे सांगितले.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

  • भारतावर 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावत असल्याचे सांगितले.

  • रशियाकडून होणारी तेल खरेदी ही प्रमुख कारणे असल्याचा आरोप त्यांनी व्यक्त केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी भारतावर 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावत असल्याचे सांगितले असून, या निर्णयामागे भारताची रशियाकडून होणारी तेल खरेदी ही प्रमुख कारणे असल्याचा आरोप त्यांनी व्यक्त केला आहे.

ट्रम्प यांच्या मते, भारताने रशियाकडून खरेदी केलेला तेल महसूल युक्रेनविरोधातील युद्धासाठी वापरला जात असल्याने अमेरिकेला कठोर निर्णय घ्यावा लागला. त्यांच्या सल्लागारांनीही भारताचे रशियन तेलावरील अवलंबित्व टॅरिफ वाढीचे कारण असल्याचे समर्थन केले आहे. याचबरोबर ट्रम्प यांनी ताज्या प्रतिक्रियेत असे दावे केले आहेत की, अमेरिकेने रशियन तेल कंपन्यांवर कडक निर्बंध लावल्यानंतर भारताने रशियाकडून तेलाची खरेदी पूर्णपणे थांबवली आहे.

ट्रम्प यांनी असेही संकेत दिले की, रशियाची आर्थिक नाडं आवळली तर युक्रेनवरील युद्धाचा ताण कमी होऊ शकतो. त्यासाठी अमेरिका रशियावरील आर्थिक दबाव अधिक वाढवत असल्याचे ते म्हणाले आहेत. ही बाब प्रथमच नाही, यापूर्वीही ट्रम्प यांनी भारताने रशियन खरेदी कमी करण्याचे आश्वासन दिल्याचा दावा केला होता. मात्र भारताने त्या संदर्भात कोणतीही अधिकृत पुष्टी केली नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा