सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्ताननं भारतावर भ्याड हल्ले सुरू ठेवले आहेत. पाकिस्तानने आज, शुक्रवारी रात्री पुन्हा भारतावर ड्रोनद्वारे हल्ला केला असून भारतीय सैनिकांनी हे हल्ले परतवून लावले आहेत. पाकच्या ड्रोन हल्ल्यांना भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर दिल आहे. दरम्यान, अमृतसरच्या वायुदल कॅटोन्मेंटजवळ गोळीबाराचे जोरदार आवाज येऊ लागले असून गुरुदासपूरच्या डेरा बाबा नानकजवळही स्फोट झाल्याचे समजते. राजस्थानात आत्तापर्यंत पाकचे 30 ड्रोनद्वारे हल्ला झाले असून सर्व 30 ड्रोन भारतानं पाडले. तर अवंतीपुरा आणि नौशेरात पाकचे ड्रोन भारतानं पाडले. फिरोजपूर आणि पठाणकोटमध्ये पाकचं क्षेपणास्त्र पाडण्यात आलं असून फिरोजपूरमध्ये पाकच्या ड्रोन हल्ल्यात एक कुटुंब जखमी झाल्याचे समजते. जखमी कुटुंबाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजौरीमध्ये पाकिस्तानचे सगळे ड्रोन भारतानं पाडले आहेत.
या ठिकाणांना पाकिस्ताननं केलं टार्गेट ?
1. जम्मू
2. सांबा
3. उरी
4. पुंछ
5. पठाणकोट
6. बारामुल्ला
7. कुपवाडा
8. राजौरी
9. तंगधार
10. जैसलमेर
11. उत्तरलाई
12. फलौदी
13. अमृतसर