ताज्या बातम्या

Pahalgam Terror Attack : भारताची सिंधू जल कराराला स्थगिती

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर निर्यण घेतले.

Published by : Rashmi Mane

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर निर्यण घेतले. यामध्ये सिंधू पाणी कराराला स्थगिती हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने आज पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार स्थगित केला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर बांधलेल्या सलाल जलविद्युत प्रकल्पातील तसेच रामबन येथे चिनाब नदीवर बांधलेल्या बगलिहार जलविद्युत प्रकल्पातील दृश्ये एएनआयने एक्स हँडलवर शेअर केले आहेत.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये वाहणारी सिंधू नदी परिचित आहे. सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याचे भारत-पाकिस्तानमध्ये वाटप करण्यासाठी 19 सप्टेंबर 1960 रोजी एक करार करण्यात आला. हाच करार सिंधू पाणी करार म्हणून ओळखला जातो. या करारावर एकमत होण्यासाठी भारत आणि पाकिस्तानात 9 वर्षे चर्चा सुरू होती. त्यानंतर 1960 मध्ये या करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. 19 सप्टेंबर 1960 रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती अयूब खान यांनी कराची येथे या करारावर सह्या केल्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Adani Group : अदानी समूहाच्या कंपन्यांना सेबीकडून क्लीन चिट

Rohit Pawar : "कोर्टाची नोटीस मिळाल्यानंतर पाऊल उचलणार", कोकाटेंनी दिलेल्या मानहानीच्या नोटीसवर रोहित पवारांचं वक्तव्य

Gold Silver Rate : ग्राहकांची चिंता मिटली! लवकरच सोने-चांदीच्या भावात होणार मोठी घसरण; कधी ते जाणून घ्या

Chhagan Bhujbal : "अंतरवालीतील दगडफेक शरद पवारांच्या..." अंतरवालीतील दगडफेकीवर भुजबळांनी केला पडदाफाश