अमेरिकेमध्ये राहणाऱ्या भारतीय लोकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. आता अमेरिकेमध्ये राहणाऱ्याना पैसे पाठवण्यासाठी कर लागू शकतो. हा कर आता एच 1 बी व्हिसाधारकांसाठी आणि ग्रीनकार्ड धारकांसहित जे दुसऱ्या देशांमध्ये लोक राहत आहेत त्यांना द्यावा लागेल. अमेरिकन संसदेमध्ये हे बिल पास झाले तर लाखों भारतीयांवर याचा परिणाम होणार आहे. अमेरिकेत जे कामासाठी राहतात आणि जे आपल्या घरी पैसे पाठवतात त्यांना याचा फटका बसणार आहे.
नक्की आहे आहे विधेयक ?
'द वन बिग ब्युटीफुल बिल' नावाचे हे विधेयक नुकतेच यूएस हाऊस वेज अँड मीन्स कमिटीने प्रसिद्ध केले आहे. या 389 पानांच्या दस्तऐवजाच्या 327 व्या पानावर, अशा सर्व पैशांच्या हस्तांतरणावर 5 % कर लादण्याच्या तरतुदीचा उल्लेख आहे. आता, जर एखाद्या व्यक्तीने अमेरिकेतून कमी पैसे पाठवले तरी, जर तो अमेरिकन नागरिक नसेल किंवा त्याला अमेरिकन नागरिकत्व मिळाले नसेल तर त्याला कर भरावा लागेल. ज्या ठिकाणाहून पैसे हस्तांतरित केले जातील तिथे हा कर कापला जाईल. अमेरिकेत मोठ्या संख्येने भारतीय राहतात.
किती पैसे पाठवण्यात आले आहेत ?
अनिवासी भारतीयांकडून सर्वाधिक पैसे पाठवल्या जाणाऱ्या टॉप देशांच्या यादीत भारताचाही समावेश आहे. मार्च २०२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या सर्वेक्षणानुसार, 2023-24 या वर्षात अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी तिथून त्यांच्या देशातील त्यांच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना 32 अब्ज डॉलर्स पाठवले होते.