उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रयागराज शहरात भारतीय हवाई दलाचे एक प्रशिक्षण विमान अपघातग्रस्त झाले. नियंत्रण सुटल्याने हे विमान थेट पाण्यात कोसळले.
ही घटना केपी कॉलेज परिसरामागील तलावात घडली. विमान खाली पडताच जोरदार आवाज झाला, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, अपघात होण्यापूर्वी विमानातील दोन कर्मचाऱ्यांनी सुरक्षितपणे पॅराशूटद्वारे उडी घेतली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना वाचवले.
या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते. सध्या अपघाताच्या कारणांचा तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.