पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तानला धडा शिकवला. पाकिस्तानने भारतावर अनेकदा ड्रोन हल्ले केले आहे. मात्र भारताच्या तीनही सुरक्षा दलच्या कामगिरीने पाकिस्तानचा डाव हाणून पाडला. तीन दिवस भारत-पाकिस्तान तणावादरम्यान दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करारदेखील पार पडला. मात्र तरीही पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. मात्र तो डावदेखील भारताने हाणून पाडला आहे. अशातच आता 'ऑपरेशन सिंदूर', भारत आणि पाकिस्तामध्ये सध्या काय स्थिति आहे? याबद्दल माहीत देण्यासाठी भारतीय लष्कराचे तीनही प्रमुखांनी पत्रकार परिषद घेतली.
आमची लढाई दहशतवाद्यांशी - Air marshal अवधेश कुमार भारती
या पत्रकार परिषदेदरम्यान वायु, सैन्य दल आणि हवाई दल या तीनही दलांचे प्रमुख उपथित होते. यावेळी हवाई दलाचे एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की, "आमची लढाई दहशतवाद्यांशी आहे. त्यामुळे आम्ही सर्वात आधी दहशतवाद्यांवर हल्ला केला. मात्र पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा दिला आणि ही लढाई स्वतःची बनवली. त्यामुळेच त्यांना प्रत्युत्तर देणं आवश्यक होते.
त्यानंतर ते म्हणाले की, "आम्ही दहशतवाद विरोधी कारवाई केली. भारताच्या संरक्षण यंत्रणेत प्रवेश करणे अशक्य आहे. आम्ही चीन क्षेपणास्त्रदेखील पाडली". त्यानंतर लेफ्टनंट जनरल राजीव म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचा पाकिस्तानचा घडा भरला होता. आम्ही आधीच सर्व तयारी केली होती. त्यानुसार आम्ही कारवाई केली. पाकिस्तानचे अनेक ड्रोन भारताने पाडले. सीमेवरील जवान लढले त्यांच्यामुळे खूप पाठिंबा मिळाला. पाकिस्तानच्या सर्व नापाक कारवाया भारताने उद्ध्वस्त केल्या".
ऑपरेशनमध्ये आम्ही 3 प्रकारची शस्त्रे वापरली
एअर मार्शल अवधेश कुमार भारती पुढे म्हणाले की, या ऑपरेशनमध्ये आम्ही 3 प्रकारची शस्त्रे वापरली. कमी दर्जाच्या संरक्षण तोफा, एसएएमएस आणि लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे. भारतीय हवाई दलाने त्यांच्या 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान एडी सरफेस, पेचोरा, आकाश मिसाईल सिस्टीम सारख्या शस्त्रांचा वापर केला. तर पाकिस्तानने चीनमध्ये बनवलेले लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र वापरले.
जास्तीत जास्त रडारचा वापर - Vice Admiral A.N. Pramod
त्यानंतर व्हाईस अडमिरल ए.एन. प्रमोद म्हणाले की, "पाकिस्तानवर देखरेख करण्यासाठी भारतीय नौदल सक्षम होते. नौदलाने अनेक सेन्सर्स आणि इनपुटचा वापर करुन सतत नजर ठेऊन होतो. आम्ही जास्तीत जास्त रडारचा वापर केला. त्यामुळे आपल्यावर होणारे हल्ले टाळण्यास यश मिळाले".