India Pakistan War 
ताज्या बातम्या

Video : India Pakistan War: भारतीय सैन्याकडून पाकिस्तानमधील दहशतवादी लाँचपॅड उद्ध्वस्त; लष्कराकडून व्हिडीओ जारी

पाकिस्तानच्या सियालकोटमधील दहशतवादी लॉन्चपॅड भारतीय लष्कराने उडवलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Attack) बदला घेण्यासाठी भारताने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूर सुरु करण्यात आले आहे. पाकिस्तानने अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. अनेक भारतीय शहरांना लक्ष्य करून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. (India-Pakistan War) भारतीय सैन्याने योग्य प्रत्युत्तर दिले आणि सर्व हल्ले हाणून पाडले.

काल शुक्रवारी 9 मे 2025 रोजी पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतातील 26 शहरांमध्ये ड्रोन हल्ले केले. पाकिस्तानचे हे हल्ले देखील भारताने हाणून पाडले. पाकिस्तानने हल्ला केलेल्या ठिकाणांमध्ये जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरातसह, बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपोरा, नगरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, लालगढ जट्टा, जैसलमेर, बारमेर, भुज, कुआरबेट आणि लाखी नाला या ठिकाणांचा समावेश होता.

याच पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानच्या सियालकोटमधील दहशतवादी लॉन्चपॅड भारतीय लष्कराने उडवलं आहे. दहशतवाद्यांनी हे लाँच पॅड्स तयार केले होते. या ठिकाणाहूनच दहशतवाद्यांसह पाकिस्तानी लष्कर भारतावर ड्रोन हल्ले करत असल्याची माहिती मिळत असून भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत हा लाँच पॅड नष्ट झाला आहे.

यातच आता भारतीय सैन्याकडून पाकिस्तानमधील दहशतवादी लाँचपॅड उद्ध्वस्त केल्याचा व्हिडिओ लष्कराकडून जारी करण्यात आला आहे. जम्मू - काश्मीर आणि पंजाबमधील अनेक शहरांमध्ये 8 आणि 9 मे 2025च्या रात्री पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यांच्या प्रयत्नांना भारताने प्रत्युत्तर दिले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nikhil Bane : "Finally माझ्या आयुष्यात ती आली..." म्हणत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेने केली पोस्ट शेअर

Team India's New Jersey Sponsor : टीम इंडियाच्या जर्सीवर 'ड्रीम 11' नाही तर आता ही स्पॉन्सर म्हणून दिसणार 'ही' कंपनी

Dhanashree Verma : घटस्फोटानंतर धनश्री वर्माच्या गळ्यात कोणाच्या नावाचं मंगळसूत्र? फोटोने वेधलं लक्ष

Latest Marathi News Update live : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश