जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांकडून पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता काश्मीरमधील जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने घेरले असल्याची माहिती मिळत आहे. दहशतवाद्यांचा शोध गेल्या आठवडाभरापासून सुरु होता. भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू असल्याची माहिती मिळतेय. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्करानं शोधून काढल्याचीही माहिती मिळत असून त्याचबरोबर बैसरनलगतच्या कोकरनाग जंगलाला लष्करानं वेढा दिला आहे.
ड्रोनसह इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे शोध मोहीम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. हल्ल्यानंतर 4 दहशतवाद्यांचा एक गट या भागात फिरताना दिसल्याचीही माहिती मिळत आहे.