Shubanshu Shukla : भारताच्या शुभांशु शुक्लाला घेऊन जाणाऱ्या Axiom-4 चे प्रक्षेपण लांबणीवर, कारणही आले समोर  Shubanshu Shukla : भारताच्या शुभांशु शुक्लाला घेऊन जाणाऱ्या Axiom-4 चे प्रक्षेपण लांबणीवर, कारणही आले समोर
ताज्या बातम्या

Shubanshu Shukla : भारताच्या शुभांशु शुक्लाला घेऊन जाणाऱ्या Axiom-4 चे प्रक्षेपण लांबणीवर, कारणही आले समोर

अंतराळातील विलंब: शुभांशु शुक्लाचे Axiom-4 मिशन 22 जूनपर्यंत स्थगित, तांत्रिक अडचणींमुळे निर्णय.

Published by : Riddhi Vanne

भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन Air Force Group Captain शुभांशू शुक्ला Shubanshu Shukla यांना अंतराळात जाण्यासाठी आता अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. एक्सियम-4 Axiom-4 मिशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थान अर्थात 'आयएसएस'मध्ये (International Space Station) जाण्यासाठी ते 'सध्या सज्ज आहेत . मात्र ही मोहीम चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता एक्सियम-4 Axiom-4अवकाशात पाठवण्यासंदर्भाच्या निर्णयाला 22 जूनपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. याआधी एक्सियम-4 Axiom- मिशनसाठी 19 जून ही तारीख ठरवण्यात आली होती. परंतु हे मिशन आता पुढे ढकलण्यात आले आहे.

स्पेस स्टेशन space station वरील दुरुस्तीच्या कामाचे मूल्यांकन करण्यासाठी अतिरिक्त वेळ हवा आहे . त्यामुळे ही मोहीम पुढे ढकलण्याचे सांगण्यात आले आहे. हा निर्णय इस्रो ISRO आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह Union Minister Jitendra Singh यांनी घेतला आहे. हवामानातील समस्या आणि फाल्कन 9 रॉकेट Falcon 9 rocketमधील द्रव ऑक्सिजन गळतीमुळे मोहिमेत याआधी विलंब झाला होता. आता रशियन झ्वेझ्दा सर्व्हिस मॉड्यूल Russian Zvezda service module मधील दाब गळतीमुळे देखील विलंब झाला आहे. त्यामुळे स्पेस स्टेशनवरील दुरुस्तीच्या कामाचे मूल्यांकन करून तसेच मॉड्यूल फिटनेस Module fitness, क्रू हेल्थ Crew Hell,इतर गोष्टी तपासल्या नंतरच या मिशनची तारीख जाहीर करणार आहेत.

यामध्ये अमेरिका America, भारत India, हंगेरी Hungary आणि पोलंडचे चे अंतराळवीर सहभागी होणार आहेत. ही मोहीम अनेकवेळा पुढे ढकलण्यात आली आहे. सुरुवातीला याच्या प्रक्षेपणाची तारीख 29 मे ठरवण्यात आली होती. नंतर 9 आणि 10 जूनपर्यंत स्थगित केली गेली. त्यानंतर ही , 19 जूनपर्यंत ती पुढे ढकलली गेली., आता पुन्हा काही तांत्रिक अडचणींमुळे हे अभियान पुढे ढकलण्यात आलं आहे.एक्सियम स्पेस नावाची ही एक अमेरिकन कंपनी असून पहिल्यांदाच एखादा भारतीय अंतराळवीर या एक्सियम स्पेसच्या मिशनमध्ये सहभागी असणार आहे.याआधी राकेश शर्मा हे पहिले भारतीय होते, जे 1984 साली रशियन मोहिमेअंतर्गत अवकाशात झेपावले होते. या मिशन मध्ये १४ दिवस कॅप्टन शुभांशू शुक्ला अंतराळात वास्तव्य करणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी