Smriti Mandhana : टीम इंडियाची स्टार ओपनर स्मृती मानधना महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात 1 हजार धावा पूर्ण करणारी पहिली फलंदाज बनली आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्ककडे हा विक्रम होता, ज्यांनी 1997 मध्ये 970 धावा केल्या होत्या. स्मृती आणि प्रतिका रावल यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाला दमदार सुरुवात दिली. दोघांनी पॉवरप्लेमध्ये चांगले शॉट्स खेळले.
महिला एकदिवसीय सामन्यात 50 पेक्षा जास्त धावांची सर्वाधिक भागीदारी करणाऱ्या भारतीय खेळाडूंची यादी अशी आहे:
18 – हरमनप्रीत कौर आणि मिताली राज (56 डाव)
14 – स्मृती मानधना आणि प्रतिका रावल (21 डाव)
13 – अंजुम चोप्रा आणि मिताली राज (57 डाव)
13 – मिताली राज आणि पूनम राऊत (34 डाव)
स्मृतीने महिला एकदिवसीय सामन्यात 5,000 धावा पूर्ण केल्या आहेत. हा टप्पा गाठणारी ती दुसरी भारतीय आणि पाचवी जागतिक खेळाडू ठरली आहे. केवळ 112 डावात तीने ही कामगिरी केली, जी एका वेगळ्या विक्रमाची गोष्ट आहे.