ताज्या बातम्या

Travel Without Visa : व्हिसाशिवाय 58 देशात भारतीयांना प्रवास करता येणार, कोणाच्याही परवानगीची गरज नाही

व्हिसाशिवाय प्रवास: भारतीयांना आता 58 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवासाची संधी, आंतरराष्ट्रीय रँकिंगनुसार बदल.

Published by : Team Lokshahi

परदेशात फिरायला जाणे, असे अनेकांचे स्वप्र असते. फिरायला जाण्यावेळी अनेक देश आपल्याकडे पर्याय असतात. पण व्हिसासाठी कागदपत्रांची जुळावाजुळवी करणे अगदी जोखमीचे काम असते. ज्या देशामध्ये जायचे असते त्याचा व्हिसा Visa मिळण्यासाठी प्रचंडवेळ लागतो. त्यामुळे ताण निर्माण होतो. आता आपल्याला असे काही देश आहेत ज्यामध्ये व्हिसाशिवाय फिरु शकतो. आपल्या देशाच्या पासपोर्टचं रॅंकिंग जसं असेल, त्याबरोबरच या सुविधेचा लाभ आपल्याला घेता येतो.

व्हिसाशिवाय कसे काय फिरु शकतो?

प्रत्येक देशाच्या पासपोर्टचं निश्चित हे त्याच्या आंतरराष्ट्रीय रॅंकिंग (International ranking) वर निश्चित असते. दरवर्षी या रॅंकिंगमध्ये बदल होत असतात. त्यानुसार त्या देशाच्या नागरिकांना किती कोणत्या देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरण येईल हे ठरते. काहीदिवसांपूर्वी जाहीर झालेल्या हेनले पासपोर्ट इंटेक्सनुसार, भारताचे रॅंकिंग 80 वरुन 81वर घसरण झाल्याचे दिसून आले. यामुळे आता भारतीयांना व्हिसाशिवाय पर्यटन करता येणाऱ्या देशांच्या यादीमध्ये बदल झाले. त्यानुसार भारतीयांना फक्त 58 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करता येणं शक्य आहे. तसेच रॅंकिंगनुसार UK, यूरोप Europe, अमेरिका United States या देशांचा समावेश नसला तरी, मॉरिशस आणि इंडोनिया या देशांचा समावेश आहे.

व्हिसाशिवाय प्रवास करणाऱ्या देशाची नावे पुढीलप्रमाणे

मालदीव

मलेशिया

मार्शल आइलैंड्स

मायक्रोनेशिया

मंगोलिया

मॉन्टसेरॅच

मोझांबिक

म्यानमार

नामीबिया

नेपाळ

नियू

पलाऊ आयलँड्स

कतार

रंवाडा

समोआ

सेनेगल

सेशेल्स

सिएरा लियोन

सोमलिया

श्रीलंका

सेंट किट्स अॅंड नेव्हिस

सेंट लुसिया

सेंट व्हिन्सेंट अॅंड द ग्नेनेडाईन्स

टांझानिया

थायलंड

तिमोरे लेस्टे

त्रिनिदाद अॅंड टोबॅगो

तुवालू

वनाऊतू

झिम्बोब्वे

मादागास्कर

मकाओ

लाओस

किरीबाती

केनिया

कझाकिस्तान

जॉर्डन

जमैका

इंडोनिया

हैती

गिनी बिसाऊ

ग्रेनाडा

फिजी

इथिओपिया

डोमिनिका

दिजीबोरी

कूक आयलॅंड्स

कोमोरो आयलॅंड्स

केप वर्दे आयलॅंड्स

कंबोडिया

बुरुंडी

ब्रिटिश व्हर्जिन आयलॅंड्स

बोलिव्हिया

बार्बाडोस

अंगोला

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा