India vs West Indies : वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर; शुभमन गिल कर्णधार तर, उपकर्णधार 'हा' खेळाडू  India vs West Indies : वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर; शुभमन गिल कर्णधार तर, उपकर्णधार 'हा' खेळाडू
ताज्या बातम्या

India vs West Indies : वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर; शुभमन गिल कर्णधार तर, उपकर्णधार 'हा' खेळाडू

कसोटी मालिका: शुभमन गिल कर्णधार, रवींद्र जडेजा उपकर्णधार; भारताचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध सज्ज.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

  • वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली आहे.

  • संघात 7 फलंदाज, 4 अष्टपैलू आणि 4 गोलंदाजांचा समावेश आहे.

  • शुभमन गिलला संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं असून रवींद्र जडेजा उपकर्णधार म्हणून नियुक्त झाला आहे.

Indian Cricket Team Announced for Test Series Against West Indies : वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली आहे. संघात 7 फलंदाज, 4 अष्टपैलू आणि 4 गोलंदाजांचा समावेश आहे. शुभमन गिलला संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं असून रवींद्र जडेजा उपकर्णधार म्हणून नियुक्त झाला आहे. जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा कसोटी संघात परतला आहे. यष्टिरक्षक ऋषभ पंत दुखापतीमुळे संघाबाहेर आहे तर करुण नायरलाही वगळण्यात आलं आहे.

भारताचा संघ – शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), एन. जगदीसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीशकुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव.

वेस्ट इंडिजचा संघ – रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वारिकन, केव्हलॉन अँडरसन, एलिक एथानाझे, जॉन कॅम्पबेल, तेजनारायण चंद्रपॉल, जस्टीन ग्रिव्हस, शे होप, तेव्हिन इमलाच, अल्झारी जोसेफ, शेमार जोसेफ, ब्रेंडन किंग, अँडरसन फिलिप, खैरी पिएर, जेडन सिल्स.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पहिली कसोटी 2 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तर दुसरी कसोटी 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा