भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्माच्या नावे मुंबईच्या वानखेडे मैदानावर स्टॅंडचे उद्घाटन करण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी रोहित पवारचे कुटुंबीय उपस्थित असलेले दिसून आले. मात्र एका गोष्टीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
शरद पवार यांच्या नावे असलेल्या स्टँडचं उद्घाटन पार पडल्यानंतर हिटमॅन रोहित शर्माच्या नावच्या स्टँडचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी रोहित शर्माचे आई, वडील तसेच त्यांची पत्नी रितिका शर्मा उपस्थित होते. उद्घाटनासाठी मंचावर रोहित शर्माच्या स्टँडचं उद्घाटन पाहून रितिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. रितिकाचा हा व्हिडीऑ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.