America Crime News Lokshahi
ताज्या बातम्या

अमेरिकेत भारतीय तरुणाची गोळ्या घालून हत्या! ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला अन्...

अमेरिकेत भारतीय वंशाच्या नवविवाहित तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Published by : Naresh Shende

America Crime Update : अमेरिकेत भारतीय वंशाच्या नवविवाहित तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोविंद दसौर (२९) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली असून अमेरिकेत भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मृताच्या कुटुंबियांनी पोलीस तपासात त्रुटी असल्याचा आरोप केला आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मृताच्या कुटुंबियांनी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, अमेरिकेच्या इंडियाना राज्यात भारतीय वंशाच्या २९ वर्षीय गेविन दसौरची एका रोड रेजच्या घटनेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. नवविवाहित गेविन दसौर आपल्या मेक्सिकन पत्नीसह घरी जात होता. गेविन आणि ट्रक ड्रायव्हरमध्ये ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला, त्यानंतर ट्रक ड्रायव्हरने त्याच्यावर गोळीबार केला. आरोपीने इंडी शहराच्या एका चौकात त्याच्यावर गोळ्या झाडल्या. गोळी लागताच दासौर खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती दसौर कुटुंबियांनी दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा